मुंबई : वृत्तसंस्था । जालना जिल्ह्यातील मंठा नागरी सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँकेने सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. बँकेने वारेमाप कर्ज वाटप केले असून कर्ज वसुली थकली असल्याचे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनात आले.
रिझर्व्ह बँकेने मंठा कोऑपरेटिव्ह बँकेवर पुढील सहा महिन्यांसाठी निर्बंध घातले आहेत. त्यामुळे खातेदारांना ठेवींचे पैसे काढण्यावर सुद्धा निर्बंध घालण्यात आले आहेत. या बँकेला रिझर्व्ह बँकेच्या पूर्वपरवानगीशिवाय नवीन कर्ज वाटप करता येणार नाही. अनुदान, नूतनीकरण किंवा नूतनीकरण करता येणार नाही. पुढील सहा महिन्यात बॅंकेला इतर कोणतीही गुंतवणूक करता येणार नाही. कोणत्याही प्रकारच्या ठेवी स्वीकारण्यास बंधन घालण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार (कर्ज, मुदतठेव, मुदतवाढ कर्ज, तारण) करता येणार नाही, असे रिझर्व्ह बँकेनं स्पष्ट केलं आहे.
येत्या सहा महिन्यामध्ये बँकेला आपली कामगिरी सुधारुन आर्थिक सुस्थिती दाखवावी लागणार आहे. तोपर्यंत हे निर्बंध कायम राहतील असे आरबीआयने म्हटले आहे.