राज्यात ऑक्टोबरपर्यंत ५ लाख नव्या मतदारांची नोंद

registered themselves population registered loksabha projected elections 215c32a4 26f9 11e9 a07d d8ccc3ad85d5

मुंबई प्रतिनिधी । मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत राबविण्यात आलेल्या मतदार नोंदणी अभियानात ४ ऑक्टोबरपर्यंत नव्याने ४ लाख ९० हजार ०५० मतदारांची नोंदणी झाली आहे. ही आकडेवारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. त्यामुळे आता राज्यातील मतदारांची एकूण संख्या ८ कोटी ९८ लाख ३९ हजार ६०० अशी झाली आहे.

राज्यात पनवेल मतदारसंघात सर्वाधिक जास्त म्हणजेच ५ लाख ५७ हजार ५०७ मतदारांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुरुष मतदारांची संख्या २ लाख ९८ हजार ७१९ आहे तर महिला मतदारांची संख्या २ लाख ५८ हजार ६०५ इतकी आहे. सर्व्हिस मतदार म्हणून १७३ पुरुष आणि १० महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. मतदार नोंदणी अभियानानंतर या मतदारसंघात एकूण ५७६ नव्या मतदारांची नोंदणी पूर्ण झाली असल्याने आता या मतदारसंघात एकूण ५ लाख ५८ हजार ०८३ मतदार आहेत.

Protected Content