यावल प्रतिनिधी | तालुक्यातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिकरित्या अत्याचाराची दुर्दावी घटना घडली आहे. या मुलीच्या घरी जावून तिच्या कुटुंबांची भेट घेत राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी धीर दिला.
यावल तालुक्यातील एका गावातील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर गावातील एक तरूण आणि दोन अल्पवयीन मुलांनी अत्याचार केल्याची दुदैवी व संतापजनक घटना घडली होती. आज दि. १ फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या व जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माजी चेअरमन रोहिणीताई खडसे खेवलकर, जळगाव जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष वंदना चौधरी, उपाध्यक्ष द्वारकाबाई पाटील यावल तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष ग्राम पंचायत सदस्य बामणोद प्रतिभा निळ, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रा. मुकेश येवले, शेखर पाटील, वढोदे सरपंच संदीप सोनवणे, बंडू कोळी, संदेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुका अध्यक्ष देवकांत पाटील, राजेश वराडे, चंद्रकांत कोळी यांच्यासह या गावातील ग्रामपंचायत सरपंच व सदस्य गावकरी यांनी समवेत पीडित मुलीच्या नातेवाईकांशी चर्चा केली. यावेळी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या. रोहिणीताई खडसे खेवलकर यांनी या अत्याचाराच्या घटनेतील त्या नराधमाला फाशीची शिक्षा द्यायला हवी अशा तीव्र शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या व या कुटुंबियांना धीर दिला.