यावल वन कास्ट्राईब संघटनेची कार्यकारिणी जाहीर

यावल-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । यावल येथील वनपरिक्षेत्रातील कास्ट्राईब वन कर्मचारी संघटनेची बैठक कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे नाशिक विभागीय अध्यक्ष रवींद्र तायडे घेण्यात आली. याप्रसंगी हासंघाचे जिल्हाध्यक्ष पुलकेशी केदार यांच्यासह जिल्हा सचिव ब्रह्मानंद तायडे,शिक्षक संघटना जिल्हाध्यक्ष बापू साळुंके,वन विभागाचे जिल्हाध्यक्ष विकास सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उनपदेव येथे पार पडली.

सदर बैठकीमध्ये पुलकेशी केदार, बापू साळुंके, विकास सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना संघटनेचे ध्येय,धोरणाबाबत विचार व्यक्त करून माहीती दिली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र तायडे यांनी वन विभागातील कर्मचारी यांना कर्तव्यावर कार्य करीत असतांना होणाऱ्या विविध समस्या व अडचणींबाबत प्रकाश टाकून त्या सोडवणे बाबत मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमात कास्ट्राईब दिनदर्शिकेचे २०२४ चे प्रकाशन मान्यवरांच्या उपस्थित त्यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी कास्ट्राईब वन विभागातील कर्मचारी राकेश निकुंभे यांची जिल्हा सचिवपदी तर यावल वनविभागात आपल्या प्रशासकीय सेवेतील कार्याचा वेगळा ठसा उमटविणारे योगीराज तेली यांची संघटनेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली व त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

कार्यक्रम प्रसंगी जळगाव मनपाचे नंदकुमार गायकवाड, लोकेश बारेला, हेमलता बारेला,सुमित्रा पावरा, संजय बेलदार, दर्शन सोनवणे, संदीप पावरा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहित बारेला यांनी केले तर उपस्थितांचे आभार राकेश निकुंभे यांनी मानले. निवड करण्यात आलेल्या राकेश निकुंभे व योगीराज तेली यांचे स्वागत करण्यात आले.

Protected Content