अमरीश पटेल यांची विधानपरिषदेवर बिनविरोध निवड

धुळे प्रतिनिधी | धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून जाणार्‍या विधानपरिषदेच्या जागेवर माजी मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे नेते अमरीशभाई पटेल यांची आज बिनविरोध निवड झाली आहे.

राज्यातील विधानपरिषदेच्या जागांसाठी अर्ज मागे घेण्याची आज अंतीम मुदत होती. यात कोल्हापूरमधून सतेज पाटील यांच्या विरोधातील भाजपच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतला. तर याच्या बदल्यात धुळे-नंदुरबारमधून कॉंग्रेसने आपले उमेदवारी गौरव वाणी यांचा अर्ज मागे घेतला. अर्थात, यामुळे भारतीय जनता पक्षाचे नेते माजी मंत्री अमरीशभाई पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. अमरीश पटेल यांनी शिरपूर विधानसभा मतदारसंघात १९९० ते २००९ पर्यंत प्रतिनिधीत्व केले होते. हा मतदारसंघ राखीव झाल्यानंतर ते विधानपरिषदेवर निवडून जात आहेत.

अमरीश पटेल याआधी २०१० साली देखील विधानपरिषदेवर बिनविरोध निवडून गेले होते. यानंतर त्यांनी पुन्हा एकदा बिनविरोध निवडून जाण्याचा विक्रम केला आहे.

 

Protected Content