चोपडा प्रतिनिधी । चोपडा तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर “नो मास्क- नो एन्ट्री” मोहिमेची कडक अंमलबजावणी करण्यात आली. कोरोना विषाणूच्या प्रदुर्भाव रोखण्यासाठी ही करावाई करण्यात येत आहे.
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बस स्टॅण्ड परिसर, पंचायत समिती चौक, धनवाडी फाटा चौफुली, पंकज नगर स्टॉप ,कारगिल चौक, आशा टॉकीज चौक, गोल मंदिर चौक, तहसील कार्यालय, चिंच चौक आदी ठिकाणी शहर पोलिसांकडून कडक अंमलबजावणी करण्यात येत असून, आतापर्यंत मास्क न घालता फिरणाऱ्या व रस्त्यांवर विना मास्क मोटरसायकल चालविणाऱ्यांकडून तसेच सोशल डिस्टंसिंगचा भंग करणाऱ्या अशा सहाशे नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन १ लाख २० हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.
चोपडा रोटरी क्लबने चोपडा केळी व्यापारी संघटनेच्या सहकार्याने पोलिस यंत्रनेला मदत व्ह्यवी व कोरोनाच्या रुग्णाचा आकडा कमी व्ह्यवा , चोपडा शहर कोरोना मुक्त व्ह्यवे म्हणून रोटरी क्लब मार्फ़त वीना मास्क फिरणाऱ्या व्यक्तीना तब्बल 2000 मास्कचे वाटप करण्यात आले , त्यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन अहिरराव , सचिव रूपेश पाटील , चोपडा शहर पोलिस स्टेशनचे पीआय संजय ठेंगे, एम डब्ल्यू पाटील संजय शर्मा, आरिफ शेख, सुरेश पाटील, विलास कोष्टी उपस्थित होते.
गेल्या पंधरा दिवसा पासून शहरात विना मास्क फिरून शासनाच्या नियमांचे उल्लंघन करून कोरोना संसर्गवाढीसाठी मदत करणाऱ्या बेजबाबदार नागरिकांविरोधात विशेष मोहीम उघडली आहे.यामुळे कोरोनाला चांगलाच आडा बसला असून,त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत . शहरात व ग्रामीण भागात अशीच धडक कारवाई काही दिवस सुरू राहिली तर निश्चितच चोपडा तालुक्यातून शंभर टक्के कोरोना हद्दपार होईल. आरोग्य यंत्रणेने घेतलेली काळजी , रोटरी क्लब सारख्या सेवाभावी संस्थाचे सहकार्य आणि शहर पोलिसांची ” नो मास्क – नो एन्ट्री ” मोहीमे मुळे गेल्या पंधरा दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होताना दिसून येत आहे.
शहरातील रोटरी क्लब तसेच सामाजिक व राजकीय प्रतिनिधीची बैठक घेऊन नो मास्क – नो एंट्री ही संकल्पना लोक चळवळ व्ह्यवी व लोकांनी 100% मास्क वापरून कोरोनाला हरवावे तसेच प्रत्येक दुकानदाराने आपल्या दुकानासमोर नो मास्क – नो एंट्रीचा फलक लावावा व कडक अंमलबजावणी करुन पोलिस प्रशासनास सहकार्य करावे व मास्क न वापरणाऱ्या गिरहाइकास कोणतीच वस्तु देऊ नये असे आवाहन केले आहे.