रोजगार महोत्सवाचे आयोजन ही बेरोजगारांसाठी संधीची उपलब्धता – संजय गरूड

जामनेर प्रतिनिधी । बेरोजगारांना रोजगार महोत्सवाचे आयोजन करून संधीची उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न निश्चितच अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन संजय गरूड यांनी जामनेर येथे केले‌.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमीत्त जामनेर येथे रोजगार महोत्सवचे आयोजन करून वाढदिवस साजरा करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. 

 अनेक युवक-युवतींकडे शिक्षणाच्या पदव्या असुनही ते चातकाप्रमाणे नोकरीची वाट बघत असतात. त्यासाठी आपल्या राष्ट्रवादी पक्षाकडुन छोटासा प्रयत्न आम्ही केला आहे. यापुढेही रोजगार महोत्स्वाचे वेळोवेळी आपण आयोजन करून बेरोजगार युवक युवतींना रोजगार कसा उपलब्ध होईल यासठी प्रयत्नशील राहु अशी ग्वाही गरूड यांनी बोलताना दिली. 

मंचावर अरूण गुजराथी,मा.पालकमंत्री गुलाबराव देवकर, डिंगबर पाटील, वंदना चौधरी, प्रदिप लोढा, भगवान पाटील, रविंद्र पाटील, अरविंद मानकरी, प्रतिभा शिरसाठ, प्रमिला पाटील, विलास राजपूत, राजेंद्र पाटील, डॉ.प्रशांत पाटील, आर.एम.गायकवाड, श्रीराम सातपुते, माधव चव्हाण, सागर कुमावत, अनिल बोहरा, रुपेश चिप्पड आदि मान्यवर उपस्थित होते.

माजी मंत्री गुलाबराव देवकर, अरूण गुजराथी यांनीही आपल्या मनोगतात आयोजित करण्यात आलेल्या रोजगार महोत्सवाच्या नियोजनाच्या बाबतीत राष्ट्रवादी पक्षाच्या आयोजक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. यावेळी विविध नामांकित कंपनीकडून ४२८ जणांना तात्काळ जागेवर नियुक्तीपत्र देण्यात आले तर २२४ जणांना पुढील महिन्याच्या १ तारखेला नियुक्ती पत्र दिले जाणार असुन उर्वरित ३०० जणांना शैक्षणिक पात्रतेनुसार मोबाईलवर लिंकद्वारे प्रशिक्षण देवुन नियुक्त्या केल्या जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जामनेर तालुकाध्यक्ष संदिप हिवाळे यांनी दिली. यशस्वीतेसाठी तालुकाध्यक्ष राजेंद्र चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रल्हाद बोरसे, तालुका सचिव दिपक रिछवाल, राजु नाईक, विनोद माळी, जितेश पाटील, अमोल पाटील, विशाल पाटील, राजुभाई जंटलमँन, पुंडलिक पाटील आदि पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले

Protected Content