जळगाव– कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांना स्वस्त धान्य मिळण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येवू नये. याकरीता हेल्पलाईन उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
शासन व जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. नागरीकांना काही अडचण आल्यास त्यांच्या अडीअडचणीचे निराकरण करण्यासाठी, रेशनिंग(PDS) संदर्भातील तक्रारी नोंदविणे, रेशनची माहिती मिळविण्यासाठी हेल्पलाईन उपलब्ध करुन देण्यात आली आहे.राज्यात रेशनिंगसाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन कार्यरत आहे. मात्र, कोरोना महामारी नियंत्रनासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत शिधावस्तू उपलब्धतेचे सनियंत्रण करताना रेशनिंग हेल्पलाईन बाबतीत जनतेत जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे. यानुसार जिल्ह्यातील सर्व जनतेस आवाहन करण्यात येते की, रेशनिंग साठीच्या तक्रारीसाठी, रेशनिंगची माहिती मिळविण्यासाठी खालील हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा किंवा ईमेल वा ऑनलाईन तक्रार प्रणालीचा वापर करून आपली तक्रार नोंदवावी. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी केले आहे.
(1) राज्य हेल्पलाईन
कामाचा कालावधी – सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. हेल्पलाईन क्रमांक- 1800 22 4950/1967 (नि:शुल्क) अन्य हेल्पलाईन क्रमांक- 022- 23720582/23722970/23722483, ईमेल- [email protected] ऑनलाइन तक्रार नोंदविणेसाठी mahafood.gov.in वेबसाईटवर वरील ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली याचा वापर करावा.
(2) मुंबई – ठाणे शिधावाटप क्षेत्र नियंत्रण कक्ष
कामाचा कालावधी-सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत. हेल्पलाईन क्रमांक- 022-22852814
ईमेल- [email protected],
(3) जळगाव जिल्ह्याकरीता पुरवठा विभाग व्हॅटसअप क्रमांक -9307592572 असा असून जिल्हा पुरवठा शाखा, जळगाव लँडलाईन क्रमांक 0257-2229708 हा आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
वेबसाईट : https://livetrends.news
फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01
ट्विटर हँडल : https://twitter.com/LiveTrends_News
युट्युब चॅनल : https://bit.ly/342HcXH
इन्स्टाग्राम अकाऊंट : https://www.instagram.com/live_trends_news
व्हाटसअॅप क्रमांक : ९३७०४०३२००