शिवाजीनगर पूल बंद; नागरिकांच्या समस्या सुरू ! (व्हिडीओ)

जळगाव वासिम खान । आज सकाळपासून शिवाजीनगर पूल रहदारीसाठी बंद करण्यात आल्यानंतर हजारो नागरिकांना समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

प्रशासनाने आज सकाळी सात वाजेपासून शिवाजीनगर येथील पूल रहदारीसाठी बंद केला आहे. यामुळे अक्षरश: हजारो नागरिक त्रस्त झाले आहेत. महापालिका व रेल्वेच्या प्रशासनाने पूर्ण विचार न करता, आणि खरं तर सक्षम पर्याय उपलब्ध न करतांना पूल बंद करण्याची घाई केल्याची प्रतिक्रिया आज नागरिकांनी व्यक्त केली आहे. बर्‍याच जणांनी तहसील कार्यालयाजवळून जाणार्‍या रेल्वे रूळांवरून ये-जा करण्यास प्रारंभ केला आहे. खरं तर येथून ये-जा करणे हे अतिशय धोकेदायक असले तरी लोकांनी जीव धोक्यात घालून येथून वापरास सुरू वात केली आहे. काही जणांनी तर येथून वाहनेदेखील क्रॉस करण्याचा प्रयत्न केल्याचे आज दिसून आले आहे.

शिवाजीनगर रेल्वे उड्डाणपूल तोडण्याच्या कामाला सोमवारी सकाळी ८ वाजताच सुरुवात झाल्याने सकाळी शाळेत, कामावर जाणार्‍यांना मोठा फटका बसला आहे. पर्यायी रस्ता जास्त फेर्‍याचा असल्याने काहींनी तहसील कचेरीजवळ चक्क दुचाकी, सायकल आदींना रेल्वे रुळांवरून घेऊन जात रस्ता ओलांडणे सुरू केले आहे. हजारो नागरिकांचा शहरात येण्याचा जवळचा मार्ग बंद झाल्याने अनेकांनी तहसील कार्यालयाजवळील रेल्वे रुळाचा पर्यायी शॉर्टकट वापरणे पसंत केले आहे. मात्र यातून दुर्घटना होण्याची भितीदेखील आहे.

पहा– शिवाजीनगर पूल बंद झाल्याने नागरिकांचे होणारे हाल !

Add Comment

Protected Content