आम आदमी पार्टीत तिघांचा प्रवेश

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | आम आदमी पार्टीचे जळगाव शहर महानगर कार्याध्यक्ष योगेश हिवरकर व ज्येष्ठ सल्लागार डॉ. सूनील गाजरे, जळगाव शहर महानगर मीडिया प्रमुख व प्रवक्ता यांच्या नेतृत्वाखाली तिघांनी आपमध्ये जाहीर प्रवेश केला.

 

सध्या आम आदमी पार्टी ची क्रेज असल्यामुळे तरुणांमध्ये उत्साह बघायला मिळत आहे. काल दि. ७ एप्रिल रोजी  आम आदमी पार्टीमध्ये सिनेअभिनेता पवन खंबायत, सिनेमा डायरेक्टर व जळगाव आयकॉन टीव्हीचे संचालक हेमराज सोनवणे, श्रीराम फॉर्च्यून प्रायव्हेट लिमिटेडचे बिडीएम भूपेंद्र ठाकरे यांनी काल दि.७ एप्रिल रोजी जळगाव शहर आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला. दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पार्टीचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल याची सगळ्या बाजूने कौतुक होत आहे.

Protected Content