जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतील रेमंड कंपनी प्रशासनाच्या मनमानी कारभाराविरोधात कामगारांचे मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता जोरदार निदर्शने करून आंदोलन करण्यात आले. नव्या करारानुसार काम करण्यासाठी दबाव टाकला जात आहे असा आरोप कामागारांनी केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव एमआयडीसीतील रेमंड कंपनीत कामगारांच्या वेतन वाढीसह इतर प्रलंबित मागण्यांसाठी कामगारांनी कामावर बहिष्कार टाकला आहे. रेमंड कंपनी प्रशासनाने वेतनवाढ न करता प्रशासनाने दिलेल्या नियमाप्रमाणे काम करावे लागेल अश्या सुचना देण्यात आले आहे. शिवाय करारावर स्वाक्षऱ्या केल्याशिवाय कंपनीत काम करण्यात मनाई केली आहे. कंपनीच्या नव्या कराराला कामगारांनी विरोध दर्शविल्याने कंपनी प्रशासनाने आता गेल्या चार दिवसांपासून मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप लावण्यात आले असून कंपनी बंद ठेवली आहे. दरम्यान, रेमंड कंपनी कामगार देखील वेतन वाढ व प्रलंबित मागण्या पुर्ण करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. मंगळवारी २८ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता रेमंड कर्मचाऱ्यांनी कंपनीसमोर निषेध आंदोलन करण्यात आले. कंपनी प्रशासनाविरोधात जोरदार निदर्शने केली. याठिकाणी कामगार नेते तथा माजी महापौर ललित कोल्हे यांनी भेट घेवून कामगारांच्या समस्या जाणून घेतल्या. रेमंड कंपनी प्रशासन ही कामगारांच्या हिताचा निर्णय न घेतला दबाव टाकत आहे. कामगारांच्या रास्त मागण्या प्रशासनाने मान्य कराव्यात आणि कामागारांचे प्रश्न सोडवावे अशी मागणी देखील माजी महापौर ललित कोल्हे यांनी केली आहे.