यावल येथील पटेल स्कूलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल येथील श्री मनुदेवी आदीवासी शिक्षण प्रसारक मंडळाव्दारे संचलीत सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन विद्यार्थ्यांच्या विज्ञानच्या विविध विषयावर प्रयोगाने उत्साहाच्या वातावरणात पार पडला.

या निमित्ताने सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन भरवण्यात आले . प्रमुख अतिथी म्हणून किनगाव इंग्लिश मिडियम स्कूल चे विज्ञान विषयाचे शिक्षक प्रतिक तायडे व पूजा तायडे , संस्थाध्यक्ष शशिकांत फेगडे व भूमीअभिलेख अधिकारी अशोक जामकर यांना आमंत्रित करण्यात आले . या कार्यक्रमात सर्व प्रथम प्रमुख अतिथींच्या हस्ते सरस्वतीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण पूजन करण्यात आले .

शाळेच्या मुख्याध्यापिका शिला तायडे यांच्याहस्ते गुलाबपुष्प देऊन सर्व उपस्थित अतिथींचा सत्कार करण्यात आला व प्रतिक तायडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांनी विज्ञान विषयाचे विविध प्रकारचे प्रयोग साकारून अत्यंत कुशलतेने विविध प्रयोगांचे प्रात्यक्षिक करून दाखविले . विद्यार्थी प्रात्यक्षिक करताना अत्यंत उत्साहित होते तसेच त्यांनी प्रत्येक प्रयोगासाठी अत्यंत परिश्रम घेतलेले दिसून आले. त्यांची कार्यकुशलता खरोखर स्तुतिप्रिय होती तसेच या विज्ञान प्रदर्शनाने विद्यार्थ्यांच्या ज्ञानात विशेष भर पडली .अशा प्रकारे विज्ञान प्रदर्शन दिन अत्यंत उत्साहात व आनंदात पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन योगिता सावळे यांनी केले व आभार प्रदर्शन अमृता कुलकर्णी यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशांत फेगडे यांच्यासह स्कुलचे सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्गांचे विशेष सहकार्य लाभले.

Protected Content