जळगाव प्रतिनिधी । भुसावळातील बाजार पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी हे कट कारस्थान करून रिपाइं आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल होत असल्याच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयातर्फे आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी यांनी म्हटले आहे की, आपण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष राजू सुर्यवंशी हे राजकीय नेते असून एक गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत. भुसावळ नगरपालिकेत दोन वेळा नगरसेवकपद भुषविले आहे. तसेच त्यांची पत्नी विद्यामान नगरसेविका आहे. त्यामुळे त्यांचे राजकीय व व्यवसायिक हितशत्रु आहेत. सुर्यवंशी हे नेहमी सामाजिक व सांस्कृतीक कार्यक्रम घेवून गरजू लांकांना मदत करीत असतात. त्यामुळे लांकामध्ये चांगले असून त्यांचे प्रतिस्पर्धी भविष्य उध्दवस्त करणे करीता कटकारस्थान रचात राजकीय व बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी हे संगनमत करून सुर्यवंशी यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करत आहे. कोणत्याही घटनेशी काहीही संबंध नसतांना गुन्ह्यात अडवून संघटित गुन्हेगारी व हद्दपारचा प्रस्ताव तयार केला जात आहे. यासाठी जिल्हा पेठ पोलीसात राजकारणी लोकांशी हातमिळवणी केली असल्याचा आरोप राजु सुर्यवंशी यांनी केला आहे. संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची चौकशी करून न्याय मिळवून द्यावा. अशी मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना दिले आहे.
या निवेदनावर गजानन शिंपी, विनोद तायडे, दीपक तायडे, किरण तायडे, प्रल्हाद मोरे, शैलेंद्र पाटील, आसिफ गवळी, राहुल साबळे, निलेश सपकाळे, लखन बट्टू, रोहित तायडे, सोमेश सोनवणे, हर्षद सोनार, पवन इंगळे, रवी सपकाळे, संजय तायडे, ईश्वर इंगळे, अशोक बोरेकर, विकी तायडे, विष्णू पारधे, सदानंद वाघ, सतीश तायडे, संदीप सपकाळे, मिलिंद सोनवणे, हरीश भालेराव, शरद गवई, राजू इंगळे, गौतम निकम, युवराज सुरवाडे, बापू बिरडे, अजय बिऱ्हाडे, इमरान शेख, गुलाम भिमराव तायडे, सतीश निकम आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत
https://www.facebook.com/508992935887325/videos/703629863647023