वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग फेडरेशनच्या स्पर्धेत प्रकाश सपकाळे प्रथम

 

जळगाव, प्रतिनिधी । अमरावती येथे वर्ल्ड पावर लिफ्टिंग फेडरेशन (लंडन) व अमॅच्युअर पॉवर लिफ्टींग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ७ डिसेंबर दरम्यान वर्ल्डकप २०२० इंटर नॅशनल चम्पियनशिप महिला व पुरुष गटातील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत ९० किलो वजनी गटामध्ये जळगाव महापालिकेचे कर्मचारी प्रकाश गिरिधर सपकाळे यांनी प्रथम क्रमांक पटकवला.

वर्ल्ड पॉवर लिफ्टिंग फेडरेशन लंडन आयोजित अमरावती येथे दि. ५ ते ७ डिसेंबर रोजी झालेल्या २१ व्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महापालिकेचे नगरसचिव विभागातील कर्मचारी प्रकाश सपकाळे यांनी मास्टर ९० किलो वजनी गटामध्ये एकूण ४१२ किलोग्रॅम वजन उचलून प्रथम क्रमांकाचे मेडल पटकावले. प्रकाश सपकाळे यांना या स्पर्धेकरिता आवश्यक ती सर्व मदत महापालिकेचे उपायुक्त अजित मुठे, कपिल पवार, संतोष सावळे, नगरसचिव सुनील गोराने, क्रीडा अधिकारी चंद्रकांत वांद्रे यांनी केली. प्रकाश सपकाळे यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचा आयुक्त सतीश कुलकर्णी व मनपा नगरसचिव विभाग कर्मचारी यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.

Protected Content