रिंगरोड येथे वयोवृध्दाच्या खिश्यातून पाच हजाराची रोकड लांबविली

जळगाव प्रतिनिधी । रिक्षात बसता येत नाही म्हणून रिक्षातून खाली उतरवून हातचालाखीने पाकीट चोरणाऱ्या रिक्षाचालकासह इतर तिघांवर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, हिरामण माणिकराव पाटील (वय-७९) रा. श्रीहरी नगर जळगाव हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत. १३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास घरघुती सामान घेण्यासाठी गावात जाण्यासाठी ते रिंगरोडवरील पेट्रोल पंपाजवळ रिक्षा क्रमांक (एमएच १९ व्ही ३४६५) बसले. रिक्षात आगोदरच तीन व्यक्ती बसलेले होते. रिक्षात बसल्यानंतर इतरांना बसता येत नाही म्हणून त्यांना रिक्षाच्या खाली उतरवून दिले. रिक्षाचालकाने इतर तिघांना रिक्षात बसवून निघून गेला. याच दरम्यान रिक्षात मागे बसलेल्या अज्ञात व्यक्तींनी हातचालाखीने त्यांच्या खिश्यातील ५ हजार रूपये रोख आणि एटीएम काढून घेतल्याचे हिरामणराव पाटील यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. पाटील यांच्या फिर्यादीवरून जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात रिक्षाचालकासह त्याच्या तीन सहकाऱ्यांवर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ रविंद्र तायडे करीत आहे.

 

Protected Content