मुंबईत मेट्रो उद्यापासून धावणार; शाळा-कॉलेज 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच!

मुंबई वृत्तसंस्था । गेल्या सहा महिन्यांपासून लॉकडाऊनचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. मुंबईत उद्यापासून मेट्रो रेल्वे सुरु करण्यात येणार आहेत. त्याशिवाय, राज्यात उद्यापासून ग्रंथालये सुरु करण्यासही परवानगी देण्यात आली असून शाळा-कॉलेज मात्र 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. राज्य सरकारने आज जारी केलेल्या नव्या नियमावलीत धार्मिकस्थळं उघडण्याबाबतचं मात्रं कोणतंही भाष्य करण्यात आलेलं नाही.

‘अनलॉक-5’मध्ये सरकारने बार, रेस्टॉरंट, हॉटेल आणि मॉल यांना उघडण्यास सशर्त परवानगी दिली होती. त्यानंतर ग्रंथालयं सुरु करण्याची मागणी होत होती. त्यामुळे सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार राज्यभरातील ग्रंथालयं सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शाळा आणि कॉलेज 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच असणार आहेत.

राज्य सरकराने आज मिशन बिगीन अंतर्गत नवीन नियमावली जाहीर केली आहे. त्यात 31 ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच राज्यातील कोरोना परिस्थितीवर राज्य सरकार समाधानी असून कंटोन्मेंट झोन वगळता इतर भागातील व्यवहार सुरु करण्यात येत असल्याचं म्हटलं आहे. या आदेशानुसार राज्यातील सर्व अत्यावश्यक दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे.

Protected Content