Home राजकीय राहुल गांधींना पुन्हा अध्यक्ष करा- अजय माकन

राहुल गांधींना पुन्हा अध्यक्ष करा- अजय माकन

0
54

नवी दिल्ली । राहूल गांधी यांच्याकडे पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपविण्यात यावी अशी मागणी दिल्लीतील मातब्बर नेते तथा माजी मंत्री अजय माकन यांनी केली आहे.

केंद्रीयमंत्री आणि दिल्लीतील काँग्रेसनेते अजय माकन यांनी ही मागणी केली आहे. राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा पक्षाचे नेतृत्व आपल्याकडे घेण्यासाठी हीच योग्य वेळ असून पक्षात त्यांना अध्यक्षपदासाठी सर्वाधिक पाठिंबा असल्याचा दावा माकन यांनी केला. या संदर्भात ते म्हणाले की, पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आता युवा नेत्यांसाठी रस्ता तयार करून देणे गरजेचे आहे. पक्षात ठरविक वेळत बदल न केल्यास पक्षातील नेते पक्षांतर करतात. काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी राहुल गांधी यांच्या व्यतिरिक्त दुसरा चेहरा दिसत नाही जो की सर्वांना मान्य राहिल. राहुल मनाने साफ असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते सातत्याने विरोध करत आले आहेत. तसेच सामान्यांच्या समस्यांसाठी ते लढा देऊ शकतात, असंही माकन यांनी सांगितले.


Protected Content

Play sound