Home Cities जामनेर राष्ट्रीय वारकरी परीषदेच्या तालुकाध्यक्षपदी अमोल महाराज

राष्ट्रीय वारकरी परीषदेच्या तालुकाध्यक्षपदी अमोल महाराज

0
33

जामनेर प्रतिनिधी । वारकरी संप्रदायाचे ह.भ.प.निवृत्ती महाराज वक्ते प्रणित राष्ट्रीय वारकरी परिषद जामनेर तालुकाध्यक्षपदी ह.भ.प.अमोल महाराज पाटील जामनेरकर यांच्या नियुक्तीची घोषणा पंढरपूर येथून नुकतीच करण्यात आली.

याप्रसंगी तालुक्याचे उपाध्यक्ष म्हणून ह.भ.प .रामेश्‍वर महाराज पाटील निमखेडी, सचिवपदी कन्हैया महाराज परदेशी, संघटकपदी ह.भ.प. दिलीप पाटील, मार्गदर्शक म्हणून ह.भ.प.सुपडु सोनार यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली. तर परिषदेचे सल्लागार म्हणून ह.भ.प. प्रा. रामकृष्ण महाराज पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ह.भ.प.अमोल महाराज पाटील यांची नियुक्ती झाल्याबद्दल परिषदेचे विभागीय अध्यक्ष भागवताचार्य ह.भ.प. समाधान महाराज भोजेकर,जिल्हाध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्‍वर महाराज पाळधीकर यांनी अभिनंदन केले आहे.


Protected Content

Play sound