पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील न्यायालयात भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत तब्बल अडीच कोटींवर वसूली करण्यात आली. तर १ हजार ७५ प्रकरणांचा निपटारा करण्यात आले आहे. यामुळे पाचोरा न्यायालयाने विक्रमी वसूली करून अभुतपुर्व असा उच्चांक गाठला आहे.
महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण, मुंबई तथा उच्च न्यायालय, मुंबई, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगांव यांचे आदेशाने पाचोरा तालुका विधी सेवा समिती, व पाचोरा वकिल संघ पाचोरा यांचे संयुक्त विदयमाने “राष्ट्रीय लोक न्यायालय” आज रोजी पाचोरा न्यायालयात संपन्न झाले. सदरहू राष्ट्रीय लोक न्यायालयात दिवाणी व फौजदारी प्रकरणे तसेच वादपूर्व असे एकुण १ हजार ७५ प्रकरणांचा निपटारा होवून २ कोटी ३६ लाख ३० हजार ८९८ रूपयांची वसुली झाली आहे. या लोक न्यायालयात पॅनल क्रं. १ मध्ये तालुका विधी सेवा समिती, पाचोराचे अध्यक्ष तथा न्यायीक अधिकारी दिवाणी न्यायाधीश जी. बी. औंधकर, २ रे सह न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे व पंच सदस्य ॲड. ईश्वर जाधव यांनी काम पाहिले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष ॲड. प्रविण पाटील, सचिव ॲड.. राजेंद्र पाटील, ॲड.. अनुराग काटकर, ॲड. संजीव जी नैनाव, ॲड. एस. बी. माहेश्वरी, ॲड. एस. पी. पाटील, ॲड. सी. एस. शर्मा, ॲड. अनिल पाटील, ॲड. रणसिंग राजपुत, ॲड. बी. बी. पिंजारी, तसेच पंच सदस्य व जेष्ठ विधीज्ञ मंडळी उपस्थित होते. याप्रसंगी तालुका विधी सेवा समिती, पाचोराचे अध्यक्ष जी. बी. औंधकर यांनी आवाहन केले की, यापुढे होणा-या लोक न्यायालयात जास्तीत जास्त प्रकरणे ठेवून सहभाग नोंदवावा व लोक न्यायालय यशस्वी करून लाभ घ्यावा. लोक न्यायालय यशस्वीतेसाठी पाचोरा वकील संघ अध्यक्ष व सभासद, विधीज्ञ मंडळी तसेच पंचायत समिती, पाचोराचे अधिकारी वर्ग, तालुक्यातील सर्व ग्रामसेवक वृंद, बॅक कर्मचारी, दूरसंचार कर्मचारी तसेच सहाय्यक अधिक्षक, जी. आर. पवार, वरिष्ठ लिपिक अमित दायमा, संजय ठाकरे, दिपक बाविस्कर, तालुका विधी सेवा समितीचे सहायक दिपक तायडे, कनिष्ठ लिपिक अनिल गोधने, सुदर्शन पुजारी, न्यायालयीन कर्मचारी स्वप्नील पाटील, रविंद्र पाटील, ईश्वर पाटील, पोलीस कर्मचारी दिपक (आबा) पाटील, विकास सुर्यवंशी, राजेंद्र पाटील व न्यायालयातील सर्व कर्मचारी वृंद आणि पाचोरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.
*पती – पत्नी यांच्यातील वाद मिटवुन पिता पुत्रांची भेट आली घडुन*
खडकदेवळा ता. पाचोरा येथील माहेर असलेल्या शितल रोहित सावळे व रोहित बापु सावळे रा. सटाणा या पती – पत्नी मध्ये सुमारे तीन वर्षांपासून प्रलंबित असलेले वसुली व खावटी अशी केस आपसात सामंजस्याने निकाली काढण्यात आली असून शितल सावळे ही विवाहिता आपल्या दोन मुलांसह गुण्यागोविंदाने पती रोहित सावळे सह भविष्यातील सुखी संसार थाटण्यासाठी परावृत्त झाली आहे. या प्रकरणात अर्जदार शितल सावळे यांचेतर्फे अॅड. संजीव जी नैनाव तर सामनेवालातर्फे अॅड. स्वप्निल पाटील यांनी कामकाज पाहिले. या प्रकरणात शितल सावळे यांना २ रे सह दिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे यांनी मेडीटेशन दिले.