बससेवा सुरू करा; लालबावटा शेतमजूर युनियनची मागणी

चोपडा प्रतिनिधी । कोरोनामुळे गेल्या चार महिन्यांपासून बससेवा पुर्णपणे बंद आहे. अतिआवश्यक कामासाठी नागरिकांना बाहेरगावी जात येत नाही. बस महामंडळाने मोजक्या बस गाड्याचे वेळापत्रक जाहीर करून बससेवा सुरू करण्याची मागणी लालबावटा शेतमजूर युनियनतर्फे करण्यात आली आहे.

गेल्या २२ मार्च २०२० पासून राज्यातील परिवहन महामंडळच्या १८ हजार ४५० बसेस बंद असून अनलॉक काळापासून सरकार त्या सुरू करण्याचा प्रयत्न करीत आहे. बससेवा पूर्ववत सुरु झाली पाहिजे. ही गोष्ट खरी आहे, पण कोरोना महामारी काळ सुरू असल्याने हल्ली ज्या सेवा चालू आहेत त्यांना पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नाही.

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची स्थापना १९६० साली झाली त्यावेळी काही मोजक्याच गाड्या प्रत्येक जिल्ह्यात धावत होत्या परंतु त्यांचे वेळापत्रक अचूक होते म्हणून कोरोना महामारी काळात जनतेला परिवहन सेवेवर विश्वास बसण्यासाठी जाण्याच्या गाड्या व येण्याच्या वेळा गाड्यांचे वेळापत्रक वर्तमानपत्रातून जाहीर व्हावे म्हणजे लोकांपर्यंत ती माहिती जाऊन लोकांना काही कामासाठी दुसऱ्या गावात जावयाचे असल्यास तेथून काम झाल्यावर परत येण्याची हमी मिळेल व परिवहन मंडळात मंडळाच्या गाड्यांमधून पूर्ववत प्रवास करतील अर्थात या गाड्या दिवसातून एकदा सॅनीटाईझर फवारणी करून निघाल्या पाहिजे.

अशी मागणी लाल बावटा शेतमजूर युनियनतर्फे कॉम्रेड अमृत महाजन, वना‌माळी गोरख वानखेडे, वासुदेव कोळी, अरमान तडवी, प्रेमसिंग बारेला, लक्ष्मण शिंदे, हिराबाई सोनवणे, आनंदा भिल, प्रताप बारेला आदिंनी केली आहे.

Protected Content