तोल सुटल्याने दुचाकीला भीषण अपघात; दोघे जखमी

यावल – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | दुचाकीवरील तोल सुटल्याने झालेल्या भीषण अपघातात तरूणासह तरूणीला गंभीर दुखापत झाल्याची थरारक घटना आज सायंकाळी पाचच्या सुमारास यावल-चोपडा महामार्गावर  घडली आहे. यात तरूणीची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे कळते आहे.

याबाबत मिळालेली माहीती अशी की , किनगावकडुन यावलकडे एका दुचाकीवरून (क्र. एम.एच १९ एसी ०८५२) तरूण व तरूणी येत असतांना गिरडगाव जवळच्या तोलकाटया जवळील रस्ता वळणावर अचानक मोटरसायकलचा तोल सुटल्याने मोटरसायकल सरळ रोडाच्या कडेला असलेल्या एका शेतात जावुन कोसळली. यावेळी अपघातात तरुणाच्या पायास दुखापत झाली आहे. परंतु सोबत असलेल्या तरूणीला गंभीर दुखापत झाली आहे. अपघात घडल्यानंतर भाजपाचे पदधिकारी डॉ. सुनिल पाटील यांनी दोघ जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना नागरीकांच्या मदतीने तत्काळ पुढील उपचारासाठी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय विद्यालयात पाठविण्यात आले आहे. यावेळी त्या मार्गाने जात असलेले चुंचाळे येथील पत्रकार सुधीर चौधरी यांनी जखमींना उपचारासाठी पाठविण्याकरीता विशेष सहकार्य केले. तत्पूर्वी या संदर्भात जखमीची नांवे अद्याप मिळु शकली नाही. मात्र ते दोघंही भुसावळ येथील असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

Protected Content