राष्ट्रवादी शहराध्यक्ष धांडे यांनी केला डॉक्टर व अम्ब्युलन्स चालकांचा सत्कार (व्हिडिओ)

भुसावळ, प्रतिनिधी | कोरोना सारख्या महामारीच्या काळात कशाचीहि पर्वा न करता आपल्या पेशाशी एकनिष्ठ राहत रूग्ण सेवा करणाऱ्या भुसावळ शहरातील डॉक्टर व अम्ब्युलन्स चालकांना भुसावळ राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सत्कार केला.

राष्ट्रवादी भुसावळ शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी कोरोना योद्धे डॉक्टर व अम्ब्युलन्स चालकांचा पी.पी.ई किट, सँनेटायझर व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. या सत्कारामुळे आम्ही भारावुन गेल्याचे डॉक्टरांनी भावना व्यक्त केल्यात. जगभरात कोरोनाच्या विषाणुने थैमान घातले आहे. मोठ्या शहरापासून गावापर्यंत कोरोनाने शिरकाव केला आहे. यामुळे सामान्य माणसापासुन ते काही डॉक्टरांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाच्या संकट काळात देखील रूग्णाना अहोरात्र सेवा देणारे शहरातील डॉक्टर विजेश चौधरी, डॉ. विनायक महाजन, डॉ. नितीन पाटील, डॉ.अमित देवडा, डॉ.लक्ष्मीकांत नागला, सुमधुर फांऊंडेशनचे अम्ब्युलन्स चालक रवि पाटील यांनी रूग्ण सेवा करीत माणुसकीचा धर्म जोपासला आहे. त्यांच्या सामाजिक कार्याला बळ देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन धांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी डॉक्टर व अम्ब्युलन्स चालकांना पी.पी.ई.किट, सँनेटायझर व पुष्पगुच्छ देऊन सर्वाचा सन्मान केला.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/544373106252073/

Protected Content