जळगाव, प्रतिनिधी । जळगाव महानगर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या आढावा बैठकीत महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेली जळगाव महानगरची कार्यकारणी पुर्णपणे बरखास्त करण्यात आली असून नवीन कार्यकारणीची घोषणा येत्या काही दिवसात करणार आहेत. ही बैठक महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, एजाज मलिक तसेच प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत राष्ट्रवादी युवक व युवती कॉंग्रेस,राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेस, अल्पसंख्यांक विभाग, सामाजिक न्याय विभाग तसेच इतर सेलचा आढावा घेण्यात आला. जे कार्यकर्ते कार्यकारणीत असून पदाधिकारी आहेत व जे पक्षाचे काम करत नसून त्या पदाधिकारी यांना एक संधी देवून पदमुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या. जळगाव महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली असलेली जळगाव महानगर ची कार्यकारणी पुर्णपणे बरखास्त करण्यात आली असून नवीन कार्यकारणी ची घोषणा येत्या काही दिवसात करणार आहेत. या वृत्तास महानगर जिल्हाध्यक्ष अभिषेक पाटील, यांनी दुजोरा दिला आहे. या आढावा बैठकीत पक्षसंघटना वाढीसाठीचे मुद्दे मांडण्यात आले व चर्चा करण्यात आली. आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. ष्ट्रवादी कॉंग्रेसचे जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील यासाठी प्रत्येक पदाधिकारी यांनी प्रभागात कार्यक्रम राबविणे गरजेचे असल्याचे यावर चर्चा करण्यात आली. या आढावा बैठकीत महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, एजाज मलिक, प्रदेश सरचिटणीस नामदेवराव चौधरी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवक अध्यक्ष स्वप्निल नेमाडे, विद्यार्थी अध्यक्ष अक्षय वंजारी, उत्तर महाराष्ट्र महिला विभागीय उपाध्यक्षा कल्पना पाटील, पदवीधरचे अध्यक्ष प्रा. अनिल पाटील, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष जितेंद्र चांगरे, कार्याध्यक्ष तुषार इंगळे, अल्पसंख्यांक महानगराध्यक्ष रिजवान खाटिक, अल्पसंख्यांक ग्रामीण अध्यक्ष मजहर पठाण, ओबीसी सेलचे अध्यक्ष कौसर काकर, युवती अध्यक्ष आरोही नेवे, महानगर वरिष्ठ उपाध्यक्ष रवींद्र देशमुख आदी पदाधिकारी उपस्थित होते.