शाहुनगरात महिलेला मारहाण करून दोघांनी सोन्याची पोत लांबविली

जळगाव प्रतिनिधी । शहरातील शाहुनगर परिसरात दोन जणांना घरात घुसून नासधुस करून महिलेच्या गळ्यातील २० हजार रूपये किंमतीची सोन्याची मंगलपोत लंपास केल्याचा प्रकार उडघकीला आला आहे. शहर पोलीस ठाण्यात दोन जणांवर जबरी चोरी आणि मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, नसरिनबी शेा वसीम (वय-२८) रा. इंदिरा नगर शाहु नगर हे घरकाम करतात. या कामाच्या निमित्ताने १ डिसेंबर रोजी बाहेरगावी गेल्या होत्या. रात्री ९ वाजता त्या घरी आल्यावर घरातील सामानाची नासधुस केल्याचे दिसून आले. दरम्यान, शाहुनगर भागातील परवीनबी शेख वसीम आणि शेख यासीन यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी डोक्यात लोखंडी झारेने मारून गंभीर दुखापत केली आणि गळ्यातील २० हजार ४०० रूपये किंमतीची मंगलपोत तोडून घेतली. तसेच घरातील मोबाईल, टिव्ही आणि इतर गृहउपयोगी सामानाची नासधुस केली. याप्रकरणी नसरिनबी शेख यांच्या तक्रारीवरून शहर पोलीस ठाण्यात रवीनबी शेख वसीम आणि शेख यासीन यांच्या जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि गणेश बुवा हे करीत आहे.

Protected Content