राज्यात पावसाचे पुनरागमन; हवामान खात्याचा अंदाज

पुणे प्रतिनिधी | गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेला पाऊस राज्यात परतणार असून येत्या चार दिवसांमध्ये काही ठिकाणी मुसळधार जलधारा कोसळणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

बंगालच्या उपसागरात तयार होण्यार्‍या कमी दाबाचे क्षेत्र, त्याचा पश्चिम व मध्य भारतातून प्रवासाची शक्यतेमुळे महाराष्ट्र राज्यात येत्या चार ते पाच दिवसात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

राज्यात ३० ऑगस्ट रोजी पावसाचा जोर वाढणार असून परभणी, नाशिक, ठाणे, रायगडसह पालघर जिल्ह्यात ऑरेंज ऍलर्ट देण्यात आला आहे. मराठवाड्यासह विदर्भातही पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पावसाने विश्रांती घेताच राज्यातील हवामानात झपाट्याने बदल झाला आहे. दोनच दिवसांपूर्वी सरासरीखाली असणारे राज्यातील दिवसाचे कमाल तापमान आता सरासरीपुढे गेले असून, काही ठिकाणी ते सरासरीपेक्षा ४ ते ५ अंशांनी वाढले आहे. त्यामुळे उन्हाचा चटका आणि उकाडयातही अचानक वाढ  झाली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून राज्यात सर्वत्र पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. दुसर्‍या आणि तिसर्‍या आठवड्यापर्यंत अनेक भागात कमी-अधिक प्रमाणात पावसाची हजेरी होती. नंतर मात्र पाऊस गायब झाल्याने शेतकरी चिंताक्रांत झाले आहेत.

 

 

 

Protected Content