अंतुर्ली येथे ज्ञानोदय वाचनालयात वाचनदिन साजरा

 

muktainagar

 

मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील अंतुर्ली येथे ज्ञानोदय सार्वजनिक वाचनालयात ग्रंथ-प्रदर्शन व वाचनदिन साजरा करण्यात आला.

याबाबत माहिती अशी की, कार्यक्रमाच्या सुरुवात ही ग्रंथालय चळवळीचे प्रणेते रंगनाथन यांच्या प्रतिमेस वाचनालयाचे अध्यक्ष एस.ए. भोई यांनी पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. शासन परिपत्रकानुसार आज (दि.19 जून) रोजी ज्ञानोदय अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले. तसेच सार्वजनिक वाचनालयात वाचनदिन व ग्रंथप्रदर्शन भरवण्यात आले. यावेळी वाचना संदर्भात भोई यांनी मार्गदर्शन केले. वाचनालयात बालविभाग, महिला विभाग व पुरुष विभाग या विभागाच्या बाबतीत माहिती देण्यात आली. दिल्ली ग्रंथालयात एकूण 26,000 ग्रंथ वर्तमानपत्रे 20 व 65 नियतकालिक तसेच या वाचनालयात 350 वाचक आहेत. यावेळी शरद महाजन, संजय वाडीले, सोपान भाई, बारी, गणेश नावकर, ब्रिजलाल भाई, हिरामन भोई, भानुदास पाटील, भैय्या शेख, लहू वाडीले, ज्ञानेश्वर चांगदेवकर, ग्रंथपाल मधुकर वानखेडे व वाचक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Protected Content