जिल्ह्यात एसटी बस पूर्ववत सुरु होण्यास आदेशाची प्रतीक्षा

 

जळगाव, प्रतिनिधी । गेल्या 3 महिन्यांपासून प्रत्येक गावातील बंद असलेली एसटी महामंडळाची सेवा गुरुवारपासून पूर्ववत करण्याचा निर्णय महामंडळाने बुधवारी बैठकीत घेतला. यानुसार आज जळगाव येथील एसटी सेवेस प्रारंभ होणे अपेक्षित होते. मात्र आदेश न आल्याने जळगाव आगारातून गुरुवारी एकही बस धावली नाही.

ग्रामीण भागातील नागरिकांना परिवहनमंत्री अनिल परब यांनी घेतलेल्या निर्णयाने दिलासा मिळाला आहे. परंतु,जळगाव जिल्हा रेड झोनमध्ये असल्याने जिल्हा अंतर्गत एसटी सेवा सुरु होण्याची शक्यता धूसर झाली आहे. जळगाव आगारात वरिष्ठांकडून कुठलेही प्राप्त झालेले नव्हते अशी माहिती मिळाली. नेहमीप्रमाणे एसटी बस आगारात बंद होत्या, बसस्थानकात शुकशुकाट दिसून आला. दरम्यान विभाग नियंत्रक राजेंद्र देवरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्यापि कुठलेही आदेश आलेले नाहीत.लेखी आदेश आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल असे सांगितले.

Protected Content