हिंगोणा परिसरात बेकायदेशीर गावठी दारूची सर्रास विक्री

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील हिंगोणा येथे गावठी हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणावर विक्री होत आहे. दरम्यान दारूची सर्रास विक्री होत असल्याने दारूपिऊन धिंगाणा घालून किरकोळ भांडण होत असल्याने गावातील ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. पोलीसांनी याकडे लक्ष देण्याची मागणी गावातून होत आहे.

लॉकडाऊनमध्ये सर्वत्र दारू विक्री बंद करण्यात आली असतांना हिंगोणा गावात व परिसरात विविध ठिकाणी गावठी हातभट्टीची दारूची व सर्रासपणे विक्री होत आहे. गावात दारूच्या आहारी गेलेले तळीराम आपली नशा कशी भागव्याची यासाठी जिकडे तिकडे वणवण फिरून वाटेल तो पैसा देऊन नशा करण्यासाठी फिरत असल्याचे दिसुन येते. काही जवळच्या लोकांना गावठी हातभट्टी विकत आहे. सातपुडा या अतिदुर्गम अशा क्षेत्रातील तिड्या मोहमांडली, जानोरी येथून हिंगोणा गावात आणून सर्रासपणे बेकायदेशीर गावठी हातभट्टीची दारू विक्री होत आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे सधा कोरोना आजाराची मोठी साथ सुरू असुन उपचारासाठी नागरीकांची मोठी गर्दी प्राथमिक आरोग्य केंद्रावर होतांना दिसुन येत असतांना त्याच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळ मोठया प्रमाणावर दारू पिण्यासाठी तळीरामांची मोठी गर्दी होतांना दिसत आहे. गावातील गल्ली बोळामध्ये मोर धरण मार्गाच्या स्त्याकडे, प्लॉट परिसरातमध्ये संध्याकाळच्या सुमारास दारूपिणाऱ्या तळीरामांची वर्दळ असते त्यामुळे अल्पवयीन मुले व्यसनाधीन होत आहे. दारुड्यांना दारूची झिंग चडल्यावर दररोज कुठल्या न कुठल्या कारणाने गावात किरकोळ भांडण होत असल्याने गावातील नागरिकांचे व महिलांची डोकेदुखी वाढली आहे. गावात होणारी दारू विक्री तात्काळ थांबवावी अशी मागणी महिला व ग्रामस्थांकडून होत आहे.

Protected Content