राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी सलीम इनामदार यांची निवड

जळगाव, प्रतिनिधी । राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश कार्याध्यक्ष  जावेद हबीब यांनी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी सलीम इनामदार यांची अल्पसंख्यांक विभागाच्या प्रदेश सरचिटणीसपदी नुकतीच निवड केली.

 

अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेश कार्यध्यक्ष जावेद हबीब हे जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील यांच्या शिफारसीवरून सलीम इनामदार यांना प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्तीचे पत्र दिले.  याप्रसंगी  जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील , महानगर अध्यक्ष अभिषेक पाटील,  एजाज मलीक, नदीम मलीक शेख अल्लाउद्दिन,  युवा जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पाटील ,  अशोक पाटील , अशोक लाडवंजारी,  महिला अध्यक्ष मंगला पाटील,  अश्विनी विनोद देशमुख. डॉ. रिजवान खाटीक, इम्तियाज पाशा, शोएब शेख, शकिर पिंजारी, इम्तियाज शेख भुसावळ इलियास मेमन, जॉन यांची प्रमुख उपस्थिती होती.  

 

Protected Content