रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | रावेर पंचायत समितीमधिल बहुचर्चीत वयक्तीक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचार प्रकरणाची उपलोक आयुक्त मुंबई यांनी दखल घेतली असून याप्रकरण संदर्भातील त्यांनी विभागीय आयुक्त नाशिक यांना चौकशीचा अहवाल मागितला आहे.
रावेर पंचायत समिती मधिल बहुचर्चीत शौचालय योजनेचा भ्रष्ट्राचार प्रकरण राज्यभर गाजत आहे. या प्रकरणाची दखल मुंबई उपलोक आयुक्त सजंय भाटिया यांनी घेतली आहे. त्यांनी यासंदर्भात विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांना चौकशी करून अहवाल मागविला आहे. आतापर्यंत या प्रकरणासंदर्भात रावेर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल असून सहायक गट विकास अधिकारी ,सेवानिवृत्त विस्तार अधिकारीसह अठरा जण तुरुंगात आहे. अद्याप अनेक जण पोलिस प्रशासनाच्या रडारवर आहे. या गुन्ह्याचे सहायक पोलिस निरिक्षक शितल कुमार नाईक तपास अधिकारी आहे.