५० हजाराचे केबलवायर चोरट्याने केले लंपास; आरोपी सीसीटीव्हीत कैद

चोपडा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील अडावद येथे दुकानासमोर ठेवलेले ५० हजार रूपये किंमतीचे ९०० फुट केबल वायर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याबाबत अडावद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित आरोपी हा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “नानाभाऊ निळकंठ महाजन (वय-५६) रा. अडावद ता. चोपडा हे वायरमन आहे. त्यांचे अडावद येथे ईलक्ट्रीक दुकान आहे. दुकानासमोर ९०० फूट केबल वायर ठेवलेली होती. गावातील रहीवाशी अफसर हुसैन मिनयार याने मंगळवारी, ५ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास ५० हजार रूपये किंमतीच केबल वायर चोरून नेल्याचे उघडकीला आले. दरम्यान, संशयित आरोपी हा केबल वायरची चोरी करतांना सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

याबाबत नानाभाऊ महाजन यांनी अडावद पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी अफसर हुसैन मिनयार याच्या विरोधात अडावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयित आरोपी अफसर हुसैन मिनयार याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस नाईक कैलास बाविस्कर करीत आहे.

Protected Content