रावेर, प्रतिनिधी । कोरोना व्हायरस पादुर्भाव रोखण्यासाठी आता नगर पालिकेने सुध्दा खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील सर्व व्यायाम शाळा,सुपर शॉप, कापडयांचा मॉल यांना गर्दी कमी करण्यासाठी खबरदारीचा उपाय घेण्याचे पत्रे सर्वांना दिले आहे. कोरोना व्हायरसचा पादुर्भाव रोखण्यासाठी नगर पालिकेने सर्व व्यायाम शाळा, सुपर शॉप, कपडयांचे मॉल आदि व्यवसायकांना खबरदारी घेण्याच्या सूचना आहेत.
प्रवासी संख्या ३० टक्केनी घटली
आज एसटी महामंडळच्या प्रवाश्यांची संख्या ३ ० टक्केनी घटली आहे .अनेक प्रवासी घरात थांबने पसंत करत असल्याने याचा महामंडळला देखिल फटका बसला आहे
बाजारपेठ होते सुरळीत
कोरोना वायरसचा प्रभाव रावेर शहरात दिसला नाही अनेक ठिकाणी दुकाने उघडे होती शहरवासी व ग्रामीण भागातील लोक शहरात येऊन विविध दुकानां मधून सामान खरेदी करतांना दिसत होते. त्यामुळे बाजार पेठ याचा प्रभाव जानवला नाही
कोंबड्याना ग्राहक मिळेना
रावेर शहरात कोंबड्याचे भाव चांगले गडगड असून कोंबड्याना 30 रुपये किलो प्रमाणे भाव मिळत आहे. तरी सुध्दा खवय्यानी कोंबड्याच्या चिकन कडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे कोंबड्याना ग्राहक मिळेना झाले आहे.
नगरपालिकेकडून खबरदारी
कोरोना वायरसची खबरदारी म्हणून नगरपालिकेनेही चांगली कंबर कसली आहे येथील मुख्यधिकारी रविंद्र लांडे यांनी पालिकेच्या सर्व स्वच्छता कर्मचा-यांना शहरात विविध उपाय-योजना करण्या संदर्भात सूचना केल्या आहे.
तालुक्यातील निवडणुका पुढे ढकलल्या
रावेर तालुक्यातील मस्कावदसिम व खुर्द दोन्ही ग्राम पंचायतीच्या निवडणुका शासनाने पुढचा आदेश येईल तो पर्यंत पुढे ढकलल्या आहे.तहसिलदार उषाराणी देवगुणे यांनी देखिल तालुक्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे अवाहन केले आहे.
कोरोनाचा केळीला’ही फटका
कोरोना’ वायरस संदर्भात घेतलेली खबरदारी केळी’ला ही बसत असून केळीच्या मालाला उठाव नसल्याचे अनेक व्यापारी सांगत आहे.त्यामुळे केळीला’ही याचा फटका बसत असल्याचे दिसत आहे.