सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेली अनेक वर्ष रावेर व यावल तालुक्यातील सौंदर्य सृष्टि जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रासाठी भूषावह आहे. निसर्ग संपन्न आणि जीवनावश्यक पाणी मुबलक प्रमाणात आपल्या आजूबाजूला आहे. हे सारे वास्तव डोळ्यात सामावून घेण्यासाठी कृतज्ञता संवाद दौरा निमित्त ठरले, असे भावोद्गार युवा नेतृत्व माननीय धनंजय भाऊ चौधरी यांनी व्यक्त केले. आज धनंजय भाऊ चौधरी यांचा बामणोद, वनोली, कोसगाव, व कठोरे प्र.सावदा या गावी कृतज्ञता दौरा केला. बामणोद येथे सात ते आठ हजार लोकवस्ती असलेल्या या गावात एप्रिल महिन्यातील चैत्रात एकविरा माता व मरी माता यांच्या नावे यात्रा भरते तसेच बारागाडे ओढले जातात.
गेल्या एक महिन्यांपासून सुरू असलेला कृतज्ञता दौरा बामणोद गावी संपन्न झाला. दौऱ्यादरम्यान धनंजयभाऊ यांनी बामणोद गावात जागृत हनुमान मंदिर, दत्त मंदिर, विठ्ठल मंदिर, स्वामीनारायण मंदिर, श्रीराम मंदिर येथे दर्शन घेतले. त्याप्रसंगी सरपंच राहुल तायडे, पंचायत समिती सदस्य विलास तायडे, उपसरपंच तुषार जावळे, रमेश जावळे, दिलीप सर, सुनील मेंबर यांनी धनंजय भाऊ यांचा सत्कार समारंभ केला.तदनंतर धनुभाऊंनी हाती घेतलेले समाजकार्याचे तसेच पाणी संवर्धनाचे व वृक्ष संवर्धनाचे कार्यास एक बळ म्हणून गावातील जुन्या विहिरीवर सरपंच राहुल तायडे व ग्रामस्थांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. त्यानंतर बामणोद गावाच्या जडणघडणीत ज्या लोकांनी महत्त्वाचे योगदान दिले.
कृतज्ञता म्हणून त्यांच्या नावे एक झाड लावून एक वृक्ष संवर्धनाचा महत्त्वाचा संदेश दिला. कृतज्ञता संवाद भेटीदरम्यान बामणोद गावातील तरुण युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला.तसेच माननीय आमदार शिरीष दादा चौधरी यांनी बामणोद गावातील विकासासाठी विविध योजनांतील निधीमार्फत गावात काँक्रिटीकरण,पेवर ब्लॉक, स्मशानभूमी बांधकाम, संरक्षण भिंती,गावांतर्गत येणारे रस्ते, गावाबाहेरील रस्त्यांचे डांबरीकरण,डीपीडीसी अंतर्गत ३.५ लक्ष, तीर्थक्षेत्र विकास निधीमार्फत राम मंदिर येथे विकास, अंगणवाडी बांधकाम कामे अशी भरीव स्वरूपाचा निधी देऊन कामे पूर्णत्वास केलेली आहे अशी माहिती भेटीदरम्यान सरपंच राहुल तायडे यांनी दिली. सरपंच राहुल भाऊ तायडे, उपसरपंच तुषार जावळे पंचायत समिती माजी सदस्य विलास तायडे यांच्या हस्ते जर पूजन करण्यात आले. त्याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक ग्रामपंचायत सदस्य गोपाळ जावळे, चंद्रकांत राणे, सुनील केदारे, नत्थु तायडे, प्रभाकर झोपे, प्रमोद बोरोले, अमोल येवले, शेखर कोल्हे, दिलीप बाविस्कर, गोपाळ फिरके, रमेश सोनवणे, महेश फिरके, सतीश तळेले, संजय झोपे, राजेंद्र राणे, शशिकांत झोपे, ललित झोपे, गोपाळ भालेराव, राजेंद्र केदारे, विक्रम सोनवणे, गौरव कोल्हे, तोफिक खान, अक्षय सोनवणे, रुपेश नन्नवरे, शरीफ खाटीक, गोपाळ भालेराव, विकास सोसायटी सदस्य दीपक तायडे, मेंबर दिनकर बंगाळे, ससाने सर आदी उपस्थित होते.
दुपारच्या सत्रात वनोली, कोसगाव,कठोरे प्र.सावदा या गावी कृतज्ञता संवाद यात्रा गेली. ‘पाणी आहे निसर्गाचे अनमोल रत्न, पाणी वाचवण्यासाठी करा प्रयत्न’ या निसर्गातील ऊक्ती प्रमाणे दुपारच्या सत्रात धनंजय यांनी या तीनही गावात प्रथम जागृत हनुमान मंदिर, साईबाबा मंदिर व गावातील वेगवेगळे धार्मिकस्थळा वरती दर्शन घेतले,त्यानंतर गावातील सरपंच व ग्रामस्थांच्या हस्ते गावातील जुन्या विहिरीवर जलपूजन केले.
याप्रसंगी जलपूजन व वृक्षारोपण करण्यात आले यावेळी कोसगाव येथे नारायण पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. त्याप्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक राजू पाटील, नामदेव पाटील, अरुण महाजन, राकेश पाटील, सुधाकर कोळी, हेमंत महाजन, विजय पाटील, नारायण वाघ, पंडित जाधव, रतन तायडे, लक्ष्मण अंबुसकर, देविदास तायडे, रूपा तायडे, नारायण वाघ आदी उपस्थित होते. वनोली येथे माजी सरपंच विठ्ठल यादव चौधरी यांच्या हस्ते जल पूजन करण्यात आले. त्याप्रसंगी गावातील वरिष्ठ नागरिक मधुकर पाटील, भरत चव्हाण, कपिल पाटील, हिरालाल पाटील, कैलास सपकाळे, शंभू पाटील, रूप सिंग पाटील, राजू चौधरी, किशोर पाटील, धनंजय पाटील, पुंडलिक पाटील, योगेश पाटील, शिवाजी चौधरी, ढोलू पाटील, घनश्याम पाटील, प्रमोद चौधरी, मुन्ना चौधरी, बाळू पाटील, लोला पाटील, आदी उपस्थित होते.काठोरा.प्र.सावदा येथे भानुदास तायडे, विष्णू तायडे यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. प्रसंगी गावातील प्रतिष्ठित मंडळी विश्वनाथ तायडे, मुरलीधर तायडे, वसंत तायडे, प्रकाश तायडे, भिवसान तायडे, जगन तायडे, उत्तम तायडे, प्रकाश तायडे, पांडुरंग तायडे, गोमा तायडे, बाळू तायडे, भिका तायडे आदी उपस्थित होते.