रावेर येथे संविधान दिन प्रस्तावनेचे वाचन करून साजरा

 

रावेर प्रतिनिधी । भारतीय संविधानामध्ये सर्व घटकांना सन्मानाने जिवन जगण्याचे अधिकार आहे. सर्वानसाठी समानता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केले आहे म्हणून सर्वांनी संविधानदिन संविधान वाचन करून साजरे करण्याचे अवाहन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी केले आहे.

आज २६ नोव्हेंबर भारतीय संविधान दिन संविधान दिना निमित्त निळे निशान सामाजिक संघटने तर्फे येथील कृषी उपन्न बाजार समितीमध्ये कार्यक्रम आयोजिक केला होता यावेळी तहसीलदार उशाराणी बोलत होत्या.यावेळी निळे निशान सामाजिक संघटने तर्फे बोलवलेल्या प्रवक्ते दिपक गाढे गौतम साळुंखे यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाला मोठ्या संखेने नागरीक उपस्थित होते.

यांची होती उपस्थिती

यावेळी कार्यक्रमाच्या सुरवातीला तहसीलदार उषारणी यांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. याप्रसंगी निळे निशान सामाजिक संघटनेचे आनंद बाविस्कर, पोलिस उपनिरिक्षक मनोज वाघमारे, मनोहर जाधव, विजय गाढे, महेंद्र कोचुरे, चंद्रकांत गाढे, संपर्क प्रमुख राहुल गाढे, धनराज घेटे, बाळु निकम, कार्यालयन सचिव सदाशिव निकम, सामाजिक कार्यकर्ते रवी छपरीबंद, नंदा बाविस्कर आदी उपस्थित होते.

विविध कार्यालयात संविधान दिन साजरा

यावेळी रावेर तहसिल कार्यालयात तहसीलदार उशाराणी देवगुणे यांनी सर्व कर्मचा-यांना सविधान वाचन करून संविधान दिन साजरा केला त्यानंतर रावेर पोलिस स्टेशन जिल्हा परिषद बांधकाम विभाग ग्रामीण रुग्णालय रावेर नगर पालिका पंचायत समिती येथे संविधान दिन साजरा केला.

Protected Content