Home Agri Trends रावेर येथे मका खरेदीला प्रतिसाद

रावेर येथे मका खरेदीला प्रतिसाद

0
39

रावेर प्रतिनिधी । रावेर तालुक्यातील शेतकर्‍यांनी मका खरेदी केंद्राला चांगला प्रतिसाद दिला असून आता पर्यंत सुमारे सव्वा दोन कोटीचा मका मार्केटींग फेडरेशन कडून खरेदी करण्यात आला आहे.

शासना कडून रावेर शहरातील भोकरी रोड वरील गोडाऊनवर मका खरेदीचे काम सुरु आहे.आता पर्यंत १८५ शेतकर्‍यां कडून सुमारे २ कोटी २८ लाख ८० हजार रुपयाचा १३ हजार क्विंटल मका खरेदी झाला आहे. शासना कडून एफएक्यु मक्याला १ हजार ७६० रुपये भाव निश्‍चित केला असून तालुक्यातील एक हजार शेतकर्‍यांचा मका खरेदी करण्याचा बाकी असल्याचे खरेदी विक्री संघ ग्रेडर प्रशांत पाटील यांनी सांगितले.


Protected Content

Play sound