रावेर प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी कोरोना व्हायरसची पहीली लस घेतली आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनीसह सर्वांनी कोरोनाची लस घेण्याचे अवाहन त्यांनी केले आहे.
रावेर ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणाच्या पहिल्या लस देण्याच्या कामाला सुरूवात करण्यात आली आहे. आतापर्यंत सुमारे १ हजार ६०० लोकांनी कोरोनाच्या लसचा डोस देण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे. आज पंचायत समिती गटविकास अधिकारी दिपाली कोतवाल यांनी कोरोनाची लस घेतले आहे. तसेच आजपासून रावेर तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस उपलब्ध होणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.एन.डी. महाजन यांनी सांगितले.