सचिन वाझेंची क्राईम ब्रँचमधून बदली; विरोधक अटकेवर ठाम

मुंबई प्रतिनिधी । मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी निरिक्षक सचिन वाझे यांची क्राईम ब्रँचमधून तातडीने बदली करण्यात येत असल्याची घोषणा आज गृहमंत्र्यांनी विधानपरिषदेत केली. तर भाजप मात्र अद्यापही वाझेंना अटक करण्याच्या मागणीवर ठाम आहे.

विधीमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी देखील मनसुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणावरून मोठा गदारोळ उडाल्याचे दिसून आले. विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अतिशय आक्रमक भूमिका घेत वाझे यांना आरोपी करून अटक करण्याची मागणी केली. यावेळी सभागृहात प्रचंड गदारोळ उडाला.

यावर उत्तर देतांना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाची तटस्थपणे चौकशी करण्यात येत आहे. या प्रकरणी आता पोलीस निरिक्षक सचिन वाझे यांची क्राईम ब्र्रँचमधून तातडीने बदली करण्यात येत असल्याची घोषणा देखील त्यांनी केली. तर या प्रकरणी कुणीही दोषी असेल तर कारवाई होणारत असेही अनिल देशमुख यांनी नमूद केले.

मात्र विरोधकांनी यावर समाधान न मानता विधानपरिषदेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. वाझे यांना अटक करावी ही मागणी प्रवीण दरेकर आणि भाजपच्या अन्य सदस्यांनी केली. यामुळे विधानपरिषदेचे कामकाज दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले.

Protected Content