एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; मुलगा बचावला

पैठण । येथील एका कुटुंबावर शनिवारी मध्यरात्री केलेल्या प्राणघातक हल्ल्यात तिघांचा मृत्यू झाला असून मुलगा मात्र बचावला आहे.

पैठण येथील नाथमंदीरा पाठीमागील गोदावरी काठावर असलेल्या जुने कावसन या गावात शनिवारी मध्यरात्री निवारे कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. यामध्ये पती, पत्नी व मुलगी अशा तीन जणांची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली आहे. राजू निवारे (४०) आश्‍विनी राजु निवारे (३५) व मुलगी (१०) अशी खुन झालेल्यांची नावे आहेत. मारेकर्‍यांनी निवारे कुटुंबातील सहा वर्षाचा मुलगा सोहम निवारे याच्यावरही वार केला. यात तो मृत झाल्याचे समजून मारेकरी निघून गेला. दरम्यान या मुलास उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.

एकाच कुटुंबातील तीन जणांच्या हत्येमुळे पैठणसह परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलीस उप अधिक्षक गोरख भामरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार, फौजदार छोटुसिंग गिरासे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.

Protected Content