पोलिसांवर फायरिंग करणार्‍या दोघांना घेतले ताब्यात

रावेर  प्रतीनिधी | आदिवासी भागात सहस्त्रलिंग नजिक रात्री तीनच्या सुमारास अज्ञात चार संशयीतांनी पोलिसांच्या दिशेने फायर केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात गारखेड्यातुन दोन जणांना साह.पोलिस निरिक्षक तथा तपास अधिकारी शितलकुमार नाईक यांनी ताब्यात घेतले आहे.

दि ११ च्या रात्री  पेट्रोलिंग करून पोलिस  कॅमेरा व्हॅन नं एमएच १९ एम ०६८१ या गाडीने रावेरच्या दिशेने येत असतांना रावेर कडून पाल कडे जाणा-या दोन मोटरसायक दिसल्या त्यातील एका मोटरसायकला पोलिसांनी थांबविण्याचा प्रर्यत्न केला असता.त्यांनी पोलिसांच्या दिशेने फायर केला होता.या प्रकरणी रावेरात गुन्हा दाखल करण्यात आला होता.गुन्हा तपासासाठी डिवायएसपी नरेंद्र  पिंगळे यांचे मार्गदर्शना खाली चार  पथके तयार करण्यात आली होती त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास अधिकारी शितलकुमार नाईक पोलिस कर्मचारी राजेंद्र राठोड,संदीप धनगर,अतुल तडवी,नरेंद्र बाविस्कर  त्यांच्या सहकारी पथकाने गुप्त बातमीदारा कडून माहिती काढली व जंगलात अवैद्य शिकार करणारे लोकांची माहिती काढली असता व गारबर्डी गावातील पाच जणांनी  गुन्हा केल्याचे समजले त्यापैकी रमेश जगन बारेला, वय 30 रा.गारबर्डी ता. रावेर  दिनेश जबरसिंग बारेला वय 24 वर्षे रा.गारबर्डी ता रावेर असे यांची चौकशी केली असता त्यांनी गुन्हाची कबुली दिली असून त्यांना सदर गुन्ह्यात अटक करण्यात आले आहे

असे फिरले तपासाचे चक्र

(दि. ११) रोजी शिकारसाठी वापरणा-या बंदूकीने पोलिसांवर फायर,त्यानंतर या प्रकरणी रावेरात गुन्हा दाखल झाला. व वरिष्ठ पोलिस अधिकारी श्री गवळी डिवायएसपी नरेंद्र पिंगळेंची घटनास्थळी भेट, या गुन्हाच्या तपासाची चक्र एपीआय श्री नाईकांनी घेतले स्वता कडे,दि १२ आदिवासी भागात शिकार व बंदूक वापरणा-यां बद्दलची माहिती घेतली आणि आज या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतले आह

 

Protected Content