Home क्राईम पांडे चौकातून आसोदा येथील तरूणाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

पांडे चौकातून आसोदा येथील तरूणाची दुचाकी चोरट्यांनी लांबविली; एमआयडीसी पोलीसात गुन्हा

0
41
two wheelar thift


जळगाव प्रतिनिधी । शहारातील पांडे चौकात पार्किंगला लावलेली १७ हजार रूपये किंमतीचा दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबविल्याची घटना मंगळवारी उघडकीला आला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात रात्री उशीरा अज्ञात व्यक्तीविरोधात दुचाकी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन सुधाकर पाटील (वय-३६) रा. आसोदा ता.जि.जळगाव हे जळगाव शहरातील पांडे चौकातील लुंकड टॉवर येथे हिमालाया कंपनीत सेल्समनचे काम करतात. आसोदा ते जळगाव जाण्यायेण्यासाठी ( एमएच १९ बीडब्ल्यू ०३९९) क्रमांकाची दुचाकी आहे. नेहमीप्रमाणे २५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३.३० वाजता दुचाकी पार्किंग करून लावली होती. सायंकाळी ६.३० दुचाकीजवळ गेले असता दुचाकी जागेवर मिळून आली नाही. पांडे चौकात दुचाकीचा शोध घेतला परंतू मिळून आली नाही. त्याच दिवशी सायंकाळी ७ वाजता एमआयडीसी पोलीसात तक्रार दाखल केली. आज बुधवार १० मार्च रोजी सकाळी दुचाकी मालक सुदर्शन पाटील यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक मिलींद सोनवणे करीत आहे.


Protected Content

Play sound