रावेर प्रतिनिधी । रावेर नगरपालिकेचे कॅशियर गणेश महाजन यांच्या सेवानिवृत्त निमित्ताने नगरपालिकेच्या वतीने सत्कार करून भावपुर्ण निरोप दिला. मुख्याधिकारी यांच्या वतीने त्यांना विठ्ठल रखुमाई ची आकर्षक प्रतिमा भेटवस्तू म्हणून देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष रमेश महाजन, माजी नगराध्यक्ष तथा भाजपा उपजिल्हाध्यक्ष पद्माकर महाजन, नगरसेवक सादिक मेंबर, मुख्याधिकारी रविंद्र लांडे उपस्थित होते. याप्रसंगी मान्यवरांच्या व उपस्थित कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचा निरोप सत्कार करण्यात आला. तसेच मुख्याधिकारी यांच्यातर्फे गणेश महाजन यांना विठ्ठल रखुमाईची आकर्षक प्रतिमा भेटवस्तू म्हणून देण्यात आली. यावेळी रमेश महाजन, पद्माकर महाजन, मुख्याधिकारी रविंद्र लांडे, प्रणित महाजन यांनी आपली मनोगत व्यक्त केलीत. यावेळी नगरपालिकेचे सर्व विभागातील प्रमुख कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकल्पाधिकारी निलेश महाजन तर आभार आस्थापना प्रमुख एस.पी. काळे यांनी व्यक्त केले.