रावेर दंगलीतील एक जखमी व्हेंटीलेटरवर

रावेर प्रतिनिधी । क्षुल्लक कारणावरून दोन गटात तुफान दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीत जखमी झालेल्या व्यक्तीचा आज मृत्यू झाला आहे. तर जखमीतील एकाला डोक्याला मार लागल्याने प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे. याप्रकरणी दोन्ही गटातील एकून ३०० ते ४०० जणांवर रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रावेर पोलिसात परस्पर विरोधी गुन्हे दाखल
शेख इमरान शेख फारूख यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, तालुक्यातील रसलपूर येथे गावात दुध मिळत नसल्याने रात्री ८.३० वाजेच्या सुमारास शेख इमरान यांचे मामा शेख रहेमान शेख गनी हे दोघे रावेरात दुध घेण्यासाठी दुचाकीने गावात आले. त्यावेळी रावेर भांडणाचा वाद निर्माण झाला होता. पुन्हा दोघे रसलपूर येथे जाण्यासाठी निघाले असतांना संभाजी पुलाजवळ शेख इमरानचा चुलत भाऊ शेख जावेद शेख सलिम त्यांना भेटला. गावात वाद निर्माण झाल्याने आपण गावात तातडीने निघून जावू असा सांगितले. त्याचेवळी जमाव अंगावर येत असल्याचे पाहून जमावातील मधू पहेलवान, मनोज खंडू मानकर, भैय्य धोबी, अतूल फुलारी, बंटी चौधरी (पानीवाला), राजा रामदास महाजन, गोकुळ नरेंद्र चौधरी, संतोष काशिनाथ किराणावाला, सुरेश लोणारी, शिवा वसंत चौधरी, चेतन अर्जून महाजन, हर्षल बेलसकर, यशवंत महाजन, पंकज महाजन, विक्की परदेशी, गजू परदेशी, सोपान पंचरवाला यांच्यासह इतर ८ ते १० जण यांनी शेख जावेद शेख सलीम याला बेदम मारहाण करून तिक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर जखमी केले. तर शेख इमरान आणि त्यांचे मामा शेख रहेमान यांनी घटनास्थळाहून पळ काढला. याप्रकरणी रावेर पोलीसात २७ जणांविरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या फिर्यादीत १७ जणांवर गुन्हा
दुसऱ्या फिर्यादीत अशोक प्रल्हाद महाजन (वय-५५) रा. शिवाजी चौक, रावेर यांनी म्हटले आहे की, मन्यारवाडा मशिद समोरील रोडवर मुस्लीम समाज जमले होते. तेव्हा कोरोना व्हायरस प्रतिबंध करण्यासाठी जनता कर्फ्यूचे आवाहन केले आणि रहदारीचा रस्ता असल्याने गर्दी का करता असे अज्ञात व्यक्ती बोलल्याच्या कारणावरून संशयित आरोपी इल्या याकूब चौधरी, मन्सूर इब्राहिम खान, इस्माईल इब्राहीम खान, मुस्ताक दुंड्या, शेख कालु शेख नुरा, शेख इम्रान शेख इलीयास, जमील भांडेवाल, निसारखान इसाकखान, इरफान खान भिकन खान, इसाक खान इब्राहिम खान उर्फ भुऱ्या, दस्तगीर शेख कालू, शेख मुजाहिद शेख इरफान, शेख अकील शेख सुपडू, आबीद खान इब्राहिम खान, बाबुखान उर्फ शरीफ खान भिकन खान, जुबेर खान इसाकखान यांच्यासह इतर १५० ते २०० जणांनी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास वरील सर्व मंडळी बेकायदेशीर लोकांना जमवून हातात विटा, दगड आणि काचेच्या बाटल्यांनी मारहाण करून जीवेठार मारण्याचा प्रयत्न केला आहे.

तर तिसऱ्या फिर्यादीत शासनातर्फे सपोनि शितलकुमार नाईक यांच्या फिर्यादीवरुन मन्सुर इब्राहिम खान, इस्माइल इब्राहिम खान, मुस्ताक दुंड्या, शे.इम्राण शे.इलियास, जमिल बरतनवाला, नसिरखान इसाकखान, इरफान खान भिकन खान, इसाकखान इब्राहिमखान उर्फ भु-या, आबीद खान इब्राहिम खान, बाबुखान उर्फ शरिफखान भिकनखान, जुबेरखान इसाकखान, शे.कालु शे.नुरा, दस्तगीर शे. कालु, इल्या याकुब चौधरी, शे.मुजाहिद शे.इरफान, शे.अकिल शे.सुपडु रा.रावेर व हिन्दु समाजाचे सुरेश सोनु शिंदे, गणेश हरचंद महाजन, पिन्टु मुक्तांनद दानी, प्रशांत गंगाधर दाणी, निलेश यशवंत शिंदे, पवन चिंतामण अस्वार, बापु धनु अस्वार, गणेश जगन्नाथ बारी, श्रीकांत मोहनदारी, भास्कर जगन्नाथ बारी, राजेंद्र शिंदे, कल्पेश दत्तु चौधरी, कांतीलाल शामराव महाजन सर्व रा.शिवाजीचौक, वरील सर्वांनी खासगी मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

मयत यशंवत मराठेंवर केले अंत्यसंस्कार
येथील दंगलील मयत झालेला यशवंत मराठे यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले असून पोलीस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. यावेळी नातेवाईकांनी ग्रामीण रूग्णालयात प्रचंड आक्रोश केला होता. दरम्यान मयत मराठेच्या मारेकऱ्यांना सोडू नका असे नातेवाईकांनी पोलीसांना सांगितले.

दुसऱ्या जखमी प्रकृती चिंताजनक
जखमी शेख जावेद शेख सलीम याच्या डोक्यात लोखंडी रॉड टाकून मोठ्या प्रमाणावर दुखापत केली होती. त्याच्या मानेवर व डोक्यावर तिक्ष्ण हत्याराने वार करू जखमी केले. रसलपूर गावातील काही नागरीकांनी घटनास्थळी धाव घेवून जखमी आवस्थेत पडलेल्या जावेदला तातडीने चारचाकी वाहनाने सावदा येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. त्यांची प्रक्रती अधिक खालावल्याने जळगावातील खासगी रूग्णालयात दाखल केले आहे. अजून प्रकृती चिंताजनक आहे.

४८ तासांसाठी संचारबंदी
रावेर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला आहे. प्रार्थना स्थळावरून आलेल्या जमावाने शिवाजी चौकात जोरदार दगडफेक झाल्याने, दोन्ही बाजूने तुफान दगड गोटे एकमेकांवर भिरकवल्याने जोरदार दंगल भडकली. यात संतप्त जमावाने शिवाजी चौकातील व बारी वाड्यातील पाच मोटार सायकली एक टाटा मॅजिक जाळून भक्ष्य केल्या. रात्री १२ वाजता प्रांतअधिकारी यांनी ४८ तासासाठी संचार बंदी घोषित केली आहे. रात्री उशिरा पोलिसांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे यांची भेट
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात दोन गटात झालेल्या दंगलीनंतर एका जणाचा मृत्यू झाला होता तर तीन जण जखमी झाल्याच्या गंभीर घटनेनंतर सोमवारी नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरींग दोरजे यांनी रावेर शहराला भेट देत माहिती जाणून घेतली. तर जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, भुसावळ पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, प्रांताधिकारी अभिजीत थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली.

Protected Content