रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील चार रूग्णांचे रिपोर्ट कोरोना बाधीत असल्याचे आढळून आले असून यातील तीन रूग्ण नवीन असून यासोबत उपचार सुरू असणार्या एकाचा रिपोर्ट पुन्हा पॉझिटीव्ह आला आहे.
आज रावेर तालुक्यात तब्बल चार जण कोरोना पॉझिटीव्ह आले आहे. यात सावद्यातील दोन तर कुंभारखेडा व गाते प्रत्येकी एक असे एकूण चार कोरोना बाधीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात सावदा येथील आधी पॉझिटीव्ह ठरलेल्या रूग्णाचा आजचा रिपोर्ट देखील पॉझिटीव्ह आलेला आहे. यामुळे तालुक्यातील रूग्णांची संख्या ३३ झाली असल्याची माहिती तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी दिली आहे. सावद्यात तेथील मुख्याधिकारी तर गाते व कुंभारखेडा येथे बीडीओ संबंधीत रूग्णांचा रहिवासी भाग सील करणार आहेत असेही त्यांनी नमूद केले आहे.