रावेर तालुक्यात कापूस विक्रीसाठी ३५० शेतक-यांची नोंद

 

रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील ३५० शेतक-यांनी रावेर बाजार समितीत सीसीआयला कापूस विक्रीसाठी नोंदणी केली आहे. अजुन शेतकरी नोंदणी करताय पुढील आठवड्यात अधिकृत कापूस खरेदीला सुरुवात होणार आहे.

सीसीआयला कापुस विक्रीसाठी ३५०शेतक-यांनी रावेर कृषी उपन्न बाजार समितीमध्ये नाव नोंदले आहे. पुढील आठवड्यात कापुस खरेदी सुरु होणार असल्याचे बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन यांनी सांगितले. यासाठी बाजार समितीमध्ये तालुक्यातील शेतकरी आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स व सात बारा उतारा घेऊन नाव नोंदणी करत आहे. यासाठी ५ हजार आठशे रुपये भाव निश्चित करण्यात आला असून हेक्टरी ४० क्विटल खरेदी करण्यात येणार आहे.

Protected Content