भुसावळात सोमवारी कामगार विरोधी धोरणाविरोधात द्वारसभा

 

भुसावळ प्रतिनिधी । भारत सरकारच्या कामगार विरोधी धोरण विरुद्ध विविध संघटनांतर्फे सोमवार ३० नोव्हेंबर रोजी भुसावळ येथे विशाल द्वार सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

एआयएलआरएसए, रेल कामगार सेना, एबीसीइ युनियन, एआयओबीसी व एआयजीसी  या ५ संघटनांतर्फे उद्या सोमवार ३० नोव्हेंबर रोजी सीवायएम या कार्यालय भुसावळ येथे द्वार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोनाचे सर्व नियम पाळून ही सभा घेण्यात येणार आहे. केंद्रीय कामगारांमध्ये सरकारविरोधी फार मोठ्या प्रमाणात असंतोष व जबरदस्त नाराजीचे वातावरण आहे व केंद्र सरकारतर्फे कामगार विरोधात सर्व निर्णय घेतले जात आहेत. या अनुषंगानेच रेल्वेमध्ये पाच विविध संघटना एकत्र आल्या आहेत व या माध्यमातून कामगारांचे ज्वलंत प्रश्न प्रशासनातर्फे कशाप्रकारे सोडून घ्यायचे याची सुद्धा नियोजन करण्यात येणार आहे असे ललित मुथा यांनी कळविले आहे. दरम्यान, रेल कामगार सेना केंद्रीय अध्यक्ष आनंदराव अडसुल यांच्याशी भुसावळ रेल्वे स्टेशन वर उद्याच्या विशाल प्रदर्शन व द्वार सभे बद्दल चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी ललितकुमार मुथा, अरविंद थोरात , शेख शकील ( तम्मा पहेलवान ), एम. जे. काटे, आयुष सचान, एम. के. शाह , पी. के. सिंग हजर होते.

Protected Content