रावेर तालुक्यातील २१ कोरोना पॉझिटीव्हपैकी आठ जणांचा मृत्यू

रावेर प्रतिनिधी । तालुक्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणावर संसर्ग आढळून येत आहे. रावेर तालुक्यात एकुण २१ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आले असून ८ रूग्णांचा मृत्यू झाला असल्यामुळे रावेर प्रशासन सतर्क झाले आहे.

याबाबत वृत्त असे की, मागील दहा दिवसात रावेर तालुक्यात एकवीस जण कोरोना पॉझिटीव्ह झाले असून त्यापैकी आठ जणांचा मृत्यू झालाय. मृत्यूचा दर तालुक्यात ३५ ते ४० टक्के इतके असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाऊन सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला असून प्रारंभी तालुक्यात या विषाणूचा संसर्ग नव्हता. रावेर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव होऊ नये म्हणून प्रांतधिकारी अजित थोरबोले, तहसीलदार उषाराणी देवगुणे मुख्याधिकारी आणि आरोग्य यंत्रणांनी खूप प्रयत्न केले. तथापि, तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून कोरोना वायरसने मृत्यूचे तांडव करण्यास देखील तालुक्यात सुरुवात केले आहे. मागील दहा दिवसात तालुक्यात एकविस कोरोना बाधीत पेशंट सापडले असून त्यापैकी आठ जणांनी आपला प्राण गमावला आहे. तर इतर १४ जणांवर उपचार सुरु आहे. मृत्यू दर जास्त असल्याने प्रशासकीय यंत्रणा आता सतर्क झाल्याचे दिसून येत आहे.

Protected Content