नियमित धावणाऱ्या प्रवासी रेल्वे गाड्या रद्द; आरक्षणाचा पूर्ण परतावा मिळणार

भुसावळ प्रतिनिधी । कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेतला रेल्वे बोर्ड प्रशासनाने १२ ऑगस्टपर्यंत नियमित धावणाऱ्या प्रवासी रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यात प्रवासी गाडी, मेल एक्स्प्रेस, मेमो ट्रेन, ब्रांच लाइन, दुरंतो एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे.

कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे बोर्डच्या आदेशानुसार होणारे दुष्परिणाम लक्षात घेता १२ ऑगस्ट २०२०पर्यंत भारतीय रेल्वेच्या नियमित धावणाऱ्या सर्व प्रवासी गाड्या पूर्णपणे थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला असून कोणतीही प्रवासी गाडी प्रारंभीच्या स्थानकावरून धावणार नाही, जसे की प्रवासी गाडी, मेल एक्स्प्रेस, मेमो ट्रेन, सर्व ब्रांच लाइन, दुरंतो एक्सप्रेस, पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.

भुसावळ विभागातून कोणतीही प्रवासी गाडी धावणार नाहीत
जीवनावश्यक वस्तूंसाठीच्या माल गाड्या व विशेष पार्सल गाड्या सुरू राहणार आहे. प्रवाश्यांनी प्रवासाच्या तारखेपासून ६ महिन्यांपर्यंत रद्द केलेल्या गाड्यांची तिकीटे रद्द करता येणार आहे. आरक्षण कार्यालय सुरू झाले की तिकिट रद्दसाठी प्रवाश्यानी गर्दी व घाई करू नये कारण कोरोनामुळे आरोग्यावर परिणाम होवू शकतो. आरक्षणचा परतावा हा सुरक्षित आहे आणि तो ६ महिन्यापर्यंत मिळणार आहे .
ऑनलाइन तिकीटधारकांचे तिकीट हे ऑनलाइन तिकीट रद्द करावे लागेल आणि परतावा हा बँक खात्यात जमा होणार आहे अशी माहिती रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

Protected Content