कोरोना : जिल्ह्यात आज ४९ रूग्ण आढळले; ५९ रूग्णांची कोरोनावर मात

जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या आजच्या अहवालात जिल्ह्यातून ४९ रूग्ण आढळून आले आहेत. यात चार तालुके निरंक असल्याचे दिसून येत आहे. तर आज ५९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

आजची आकडेवारी
जळगाव शहर-१५, जळगाव ग्रामीण-१, भुसावळ-११, अमळनेर-०, चोपडा-०, पाचोरा-३, भडगाव-२, धरणगाव-०, यावल-४, एरंडोल-१, जामनेर-३, रावेर-१, पारोळा २, चाळीसगाव १, मुक्ताईनगर ४, बोदवड ० आणि इतर जिल्ह्यातील १ असे एकुा ४९ रूग्ण आढळून आले आहे.

आजच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकुण ५३ हजार ८९१ कोरोना बाधित आढळून आले आहे. त्यापैकी ५२ हजार २३८ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ३६९ रूग्ण उपचार घेत आहे. यात चार रूग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत १ हजार २८४ रूग्णांचा मृत्यू झालाय. अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाले आहे.

Protected Content