रावेर तालुका प्रशासनाकडे कोरोना खर्चासाठी पैसेच नाहीत !

 

 

रावेर  : प्रतिनिधी । कोरोनासंदर्भात शासनाने मागील वर्षी रावेर तहसील प्रशासनाला खर्च करायला १६ लाख रुपये दिला होते.यावर्षीसुध्दा कोरोनाची दूसरी लाट असून लॉकडाऊन लावले आहे.परंतु यावर्षी शासनाकडून कोरोना संदर्भात निधी मिळालेला नाही

 

मागील वर्षी रावेर तहसिल प्रशासनाला कोरोना संदर्भात खर्च करण्यासाठी सोळा लाख रुपये आले होते.यामध्ये रावेर तहसिल प्रशासनाने  रुग्णवाहिका भाडे, डिझेल, जेवण व इतरवर पूर्ण सोळा लाख रुपये खर्च केले होते.परंतु यावर्षीदेखिल कोरोनाची दूसरी लाट असून तहसिल प्रशासनाला कोरोना संदर्भात कोणताही निधी अद्याप मिळालेला नाही

 

दरम्यान मागील वर्षी शासना कडून मिळालेला सोळा लाख रुपये पूर्ण खर्च  रुग्णवाहिका  भाडे, डिझेल, जेवण व इतरवर खर्च झाला आहे.यावर्षी अद्याप कोरोना संदर्भात निधी मिळाला नसल्याचे तहसीलदार उषाराणी देवगुणे यांनी सांगितले

 

Protected Content