ग्रामीण भागातील शाळा खोल्यांचे दरवाजे कोरोना रुग्णासाठी उघडले (व्हिडीओ)

खामगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बोरजवळा येथील आरोग्य अधिकारी डॉ शैलेश खंडारे त्यांच्या परिक्षेत्रातील बोरजवळा, निपाणा, भंडारी , उमाळी हिवरा या गावातील बंद असलेल्या शाळांच्या खोल्या कोरोना रुग्णांकरिता विलगीकरण कक्ष म्हणून  उपयोगात आणण्याची अभिनव संकल्पना राबवत आहेत

जिल्हा आरोग्य अधिकारी , तालुका आरोग्य अधिकारी यांचे  मार्गदर्शन डॉ खंदारे यांना लाभले आहे

आता गावातील बंद असलेल्या शाळा खोल्या देखील योगदान देत आहे त्यामुळे शहरातून ग्रामीण भागात पोहोचलेला कोरोनाचा प्रादुर्भाव निश्चित आटोक्यात येऊ शकतो याबाबत स्थानिक नागरिकांनी व आशा वर्कर्स  यांनीही समाधान व्यक्त केले

 

येणाऱ्या काळात आपल्या परिसरात असलेल्या सर्व उपायोजनाबाबत आपण दक्ष राहून उपलब्ध  साधनसामग्रीचा उपयोग करून कोरोनावर निश्चित विजय मिळू शकतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही अशा प्रतिक्रिया सर्वत्र व्यक्त होत आहेत

Protected Content